Pages

Saturday, April 30, 2011

आई


आईमुळेच आपल्यास अस्तित्व लाभे.
तिच्याच आशीर्वादाने जीवन सफल उभे.
तिच्यासारखे दैवत नाही जगती.
आईची काय सांगावी महती.

सर्व अपराध पोटात घेई.
बदल्यात प्रेमाचा सागर देई.
तिच्या वात्सल्याची आहे जगात कीर्ती.
आईची काय सांगावी महती.

आईत देव वसतो मूर्तिमंत.
कुठे देव पाहू ही नसावी खंत.
हिच्या सानिध्यात ना कशाची भीती.
आईची काय सांगावी महती.

आई लाभने , भाग्य मोठे.
समोर तिच्या ब्रम्हांड खोटे.
तिच्यासमोर पडती फिकी सर्व नाती. आईची काय सांगावी महती.

वर्णन करण्या तिचे शब्द पडती थिटे जसे.
आई हेच एक प्रेमाचं महन्मंगल काव्य असे.
भले भले तिच्या गुणांचे पोवाडे गाती.
आईची काय सांगावी महती.

शेवटी तिची सेवा हाच धर्म मानवा.
तिच्या अनंत उपकारांचा विसर ना पडावा.
अखंड सेवेत जागवाव्या राती.
आईची काय सांगावी महती.


No comments: