Pages

Saturday, January 16, 2010

हसा लेको

अमेरिकेत एका दुकानात लेदरचे एक सुंदर पाकीट बघून पु. लं. नी किमत विचारली.
विक्रत्याने ‘वन सिक्स्टी फाइव्ह’ असं सांगताच पु. ल. म्हणाले, ‘‘अरे बापरे ! मग पाकिटात काय ठेवू ?’’

:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, ‘‘बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !’’ यावर नाक उडवून त्या म्हणाल्या, ‘‘म्हणजे काय? आलेच मुळी !’’

:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


पाहुणा एका गावकर्‍याला विचारतो, ‘‘तुमच्या गावी आजवर एकही मोठा माणूस जन्माला आला नाही म्हणजे नवलच !
गावकरी,‘‘नाही बुवा! आमच्याकडं फक्त अर्भकंच जन्मतात.


:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


शिक्षक : मुलांनो, जगातले पहिले मानव कोण ?
विद्यार्थी : आदाम आणि ईव्ह !
मास्तर : त्यांचा देश कुठला ?
विद्यार्थी : रशियन !
शिक्षक : याचा पुरावा ?
विद्यार्थी : सर, त्यांना ना घालायला कपडे होते, ना राह्यला घर ! आणि खायला होत तेही एक सफरचंद, आणि तरीही आपण स्वर्गात आहोत, असं त्यांना वाटायचं!


:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


एका घरासमोर नित्याप्रमाणे आलेल्या भिकार्‍याला त्या घराचे मालक रामराव सहलीला गेल्याचे सांगण्यात आले, तेव्हा तो रागाने म्हणाला, ‘‘व्वा ! हा माणूस आमच्या पैशावर झकास मजा मारतोय !’’


:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


वेड्यांच्या इस्पितळात एक वेडा डॉक्टरांना म्हणाला, ‘‘डॉक्टर साहेब, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा निराळे वाटता !’’
‘‘कसं काय बुवा’’ डॉक्टर उत्सुकतेनं विचारतात.
‘‘डॉक्टर साहेब,’’ वेडा सांगू लागला, ‘‘तुमचा चेहरा आमच्या चेहर्‍याशी मिळता-जुळता आहे !’’

:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 



मुलगा - बाबा, जर एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात गेला तर तुमच्या राजकीय भाषेत याला काय म्हणावे ?
वडील - विश्वासघात.
मुलगा - आणि समजा, दुसर्‍या पक्षातला एखादा नेता आपल्या पक्षात आला तर ?
वडील - हृदय परिवर्तन !

:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणानं वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला. आणि उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पाहिला, हॉटेलात गेला, कोंबडी-मटण जेवला अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन घेतली, प्रॉव्हिडंड फंड घेतला, घर बांधले आणि ९५ व्या वर्षी एके दिवशी उचकीने गेला.



:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


मंजू : दाढीच्या केसापेक्षा डोक्यावरचे केस लवकर पांढरे का होतात?
महेश : अगं , डोक्यावरच्या केसांचे वय दाढीच्या केसांपेक्षा अठरा वर्षांनी जास्त असते. म्हणून ते लवकर म्हातारे होतात.



:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 


एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ’’

तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार।’’



:)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :)  :) 

झक्कास विनोद

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आफ्रिकेतल्या ओबेडुधोबुडु देशात कम्प्युटर अलीकडेच पोहोचला. कम्प्युटरला 'तो' कम्प्युटर म्हणायचं की 'ती' कम्प्युटर, हे तिथल्या भाषातज्ज्ञांना समजेना. मग त्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली.

तज्ज्ञ पुरुषांच्या गटाचं म्हणणं होतं की कम्प्युटरला 'ती' कम्प्युटरच म्हणायला हवं... कारण,
1. त्यांच्या निमात्याव्यतिरिक्त कोणालाही त्यांचं आंतरिक तर्कशास्त्र कळत नाही.
2. आपल्या 'जाती'च्या अन्य कम्प्युटर्सशी बोलताना जी भाषा वापरतात, ती इतरांना कळत नाही.
3. अगदी लहानात लहान चूकही प्रदीर्घ काळ त्यांच्या 'स्मरणा'त राहते.
4. कम्प्युटरखरेदीचा निर्णय झाला की लक्षात येते, आपण जवळपास मूळ नगाच्या किंमतीइतकीच रक्कम अॅक्सेसरीजवर खर्च करतो आहोत!!!

त्याचवेळी स्त्री तज्ज्ञ म्हणाल्या की कम्प्युटरला 'तो' कम्प्युटरच म्हणायला हवं... कारण,
1. माहिती पुष्कळ असली तरी ते इतरांच्या आज्ञावलीविना स्वत:हून काहीही करू शकत नाहीत.
2. त्यांना अडचणी सोडवण्यासाठी बनवलेलं असतं, पण, बहुतेकदा ते स्वत:च समस्या निर्माण करतात.
3. एक खरेदी करण्याचा निर्णय झाला की लगेच लक्षात येतं, आणखी थोडा वेळ थांबलो असतो, तर जरा बरं मॉडेल मिळालं असतं!!!
4. त्यांच्याशी काहीही करण्याआधी त्यांना 'ऑन' करावं लागतं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


संता : मेरे पास आज गाडी है... बंगला है... पैसा है... तेरे पास क्या है...?

बंता : मेरे पास भी गाडी है... बंगला है... पैसा है हाईई!

संता : हायला मर गये... फीर माँ किसके पास है?


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चंपूराव : काल मुंबईत बर्फ पडला हो.

गंपूराव : कॉय्य सांगता कॉय??

चंपूराव : अरे काय खोटं बोलतो की काय..

गंपूराव : नाही तसं काही नाही, पण कधी, कुठे, केव्हा, कसं??

चंपूराव : काल संध्याकाळी साडेसातला, मरीन ड्राइव्हला

गंपूराव : काल? मरीन ड्रॉईव्हला?

चंपूराव : मग काय तर.. काल संध्याकाळी साडेसातला मरीन ड्राईव्हला एक माणूस सायकलवरून बर्फ घेऊन जात होता. त्याची सायकल कलंडली आणि...आणि बर्फ पडला....


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा.

बाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात.

काय रे ह्या पैशांचे काय करणार?

काय नाय.. मुलगा उत्तरला.. मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बाबुराव अत्यंत तीरसट होते. ते एकदा बस मधें बसले.

कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या.

'आहो पण बस जिमखान्यावर जाते.' कंडक्टर म्हणाला..

'मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..' बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


तो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे.

हा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात..

तो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना..


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एकदा एका माणसाला कोस्टिपेसन चा त्रास असतो, तो डॉक्टरांकडे जातो.

पेशंन्ट:"डॉक्टर, मला अलीकडे होत नाही."

डॉक्टर: ठीक आहे, आजपासून पलिकडे बसून बघा. " फ़रक पडतो का?"


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?

कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भिमाबाईंना डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी घोडदौडीचा सल्ला दिला.........महिनाभर रपेट केल्यावर त्यांनी वजन करुन पाहीले तर चक्क २० किलो कमी.........घोड्याच.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शिक्षक : बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

चिन्टु : पान नं. १७ ते ४२.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकी : बाबा मला दहा रुपये द्या लवकर, बाहेर एक गरीब माणुस सारख ओरोडतोय .
बाबा : काय ?
विकी : 'आइस क्रीम' घ्या 'आइस क्रीम'....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?....




....





सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!''

तरीही, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला...

... का?...






...





विचार करा...

अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?

नन्या : गांधीजींचा जन्म झाला.

चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?

नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, ''बाळांनो, वर्गात जर कुणाला सुसु लागली असेल, तर त्याने करंगळी वर करावी.''

नन्या एकदम 'ट्टॉक' करून उद्गारला, ''आयला, गुरुजी, करंगळी वर केली की थांबते सुसु?!!!!''

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अमेरिकेहून परतलेला देसी अमेरिकन कसा ओळखावा? या काही खुणा.
१. दुधाच्या पाकिटावर त्यात किती टक्के चरबी आहे, याचा आकडा शोधतो.
२. 'झेड'ला 'झी' म्हणतो.
३. तारीख/ महिना/ वर्ष अशी तारीख न लिहिता महिना/ तारीख/ वर्ष अशी लिहितो.
३. इंडियन स्टँडर्ड टाइम आणि भारतीय रस्त्यांची स्थिती यांची सतत टर उडवतो.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हे आपणास माहीत आहे का?

...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?

...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?

...की डासांना दात सुद्धा असतात...?

...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?

...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?

...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?

...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?

...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?

...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?

...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?

...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?

...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?

...की बदकाच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी येत नाही...?

...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?

...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?

...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?

...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?

...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?

...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही...?

...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?

...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?

...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?

...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?

...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?

...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?

...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?

...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?


...

निबंध लिहा - 'गाय'

प्रश्न : निबंध लिहा
विषय - 'गाय'

एका मुलाने लिहिलेला निबंध :


"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय !!!! "

...