Pages

Friday, August 6, 2010

एक PJ, समस्त महिला वर्गाची माफी मागून

बबनचा एका अपघातात कान फाटला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून नवीन कान बसवला. दुसरया दिवशी..

बबन : डॉक्टर, तुम्ही बहुतेक बाई चा कान लावलात.

...


डॉक्टर : कशावरून?

बबन : मला ऐकायला व्यवस्थित येतंय, पण समजत काहीच नाहीये.

गुरुजी - गोटया

गुरुजी : गोटया समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.

गोटया : माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.

गुरुजी : समज ना. तुझ्या बापच काय जात. बर जाऊ दे.

गुरुजी : बंड्या तू समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.

बंड्या : माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.

गुरुजी : समज ना. तुझ्या बापच काय जात. सांग मी तुला अजून ५ लाडू दिले, तर किती झाले?

बंड्या : २० लाडू.

गुरुजी... : अरे मुर्खा २० कसे.

बंड्या : अहो गुरुजी समजा ना, तुमच्या बापच काय जात.

मुलगा - दुकानदार

मुलगा : (दुकानदारास) काका,डेटॉल साबण आहे?
दुकानदार : (नाकातून बोट काढत) हो आहे की.
मुलगा : मग आधी त्याने हात स्वच्छ धुवा आणि मला दोन किलो बासमती तांदूळ द्या.

भाडेकरू - मालक

भाडेकरू : मालक, रात्री खोलीत खूप उंदीर नाचतात.

घरमालक (रागाने) : मग १५० रुपये भाड्याच्या खोलीत काय "सुरेखा पुणेकर" नाचवू.

परीक्षेच्या RESULT नंतर

परीक्षेच्या RESULT नंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी
शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स
मिळणारच
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू

आणि...
जर नापास झाला
तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे
झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून
ठेवलंस
.
.
.
पण
.
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर
मारू
खरंच.... सगळे बदलतात पण मित्र नाही.....

मंग्या, आयटम बरोबर

मंग्या, आयटम बरोबर पार्कात बसला होता, ती काही बोलणार एवढ्यात, आसपास कोण नाही हे पाहून त्याने तीच चुंबन घेतल.

मंग्या : सोना, खूप गोड आहे तुझे ओठ, पण जरा ते तोंडातला चुईगम फेकशील का? मध्ये मध्ये येतंय.

आयटम (खोकत) : अरे सोन्या तेच सांगायचा प्रयत्न करत होते, चुईगम नाही आहे ते मला कफ झाला आहे खूप.