अमेरिकेत एका दुकानात लेदरचे एक सुंदर पाकीट बघून पु. लं. नी किमत विचारली.
विक्रत्याने ‘वन सिक्स्टी फाइव्ह’ असं सांगताच पु. ल. म्हणाले, ‘‘अरे बापरे ! मग पाकिटात काय ठेवू ?’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, ‘‘बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !’’ यावर नाक उडवून त्या म्हणाल्या, ‘‘म्हणजे काय? आलेच मुळी !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
पाहुणा एका गावकर्याला विचारतो, ‘‘तुमच्या गावी आजवर एकही मोठा माणूस जन्माला आला नाही म्हणजे नवलच !
गावकरी,‘‘नाही बुवा! आमच्याकडं फक्त अर्भकंच जन्मतात.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
शिक्षक : मुलांनो, जगातले पहिले मानव कोण ?
विद्यार्थी : आदाम आणि ईव्ह !
मास्तर : त्यांचा देश कुठला ?
विद्यार्थी : रशियन !
शिक्षक : याचा पुरावा ?
विद्यार्थी : सर, त्यांना ना घालायला कपडे होते, ना राह्यला घर ! आणि खायला होत तेही एक सफरचंद, आणि तरीही आपण स्वर्गात आहोत, असं त्यांना वाटायचं!
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
एका घरासमोर नित्याप्रमाणे आलेल्या भिकार्याला त्या घराचे मालक रामराव सहलीला गेल्याचे सांगण्यात आले, तेव्हा तो रागाने म्हणाला, ‘‘व्वा ! हा माणूस आमच्या पैशावर झकास मजा मारतोय !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
वेड्यांच्या इस्पितळात एक वेडा डॉक्टरांना म्हणाला, ‘‘डॉक्टर साहेब, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा निराळे वाटता !’’
‘‘कसं काय बुवा’’ डॉक्टर उत्सुकतेनं विचारतात.
‘‘डॉक्टर साहेब,’’ वेडा सांगू लागला, ‘‘तुमचा चेहरा आमच्या चेहर्याशी मिळता-जुळता आहे !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
मुलगा - बाबा, जर एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात गेला तर तुमच्या राजकीय भाषेत याला काय म्हणावे ?
वडील - विश्वासघात.
मुलगा - आणि समजा, दुसर्या पक्षातला एखादा नेता आपल्या पक्षात आला तर ?
वडील - हृदय परिवर्तन !
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणानं वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला. आणि उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पाहिला, हॉटेलात गेला, कोंबडी-मटण जेवला अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन घेतली, प्रॉव्हिडंड फंड घेतला, घर बांधले आणि ९५ व्या वर्षी एके दिवशी उचकीने गेला.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
मंजू : दाढीच्या केसापेक्षा डोक्यावरचे केस लवकर पांढरे का होतात?
महेश : अगं , डोक्यावरच्या केसांचे वय दाढीच्या केसांपेक्षा अठरा वर्षांनी जास्त असते. म्हणून ते लवकर म्हातारे होतात.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ’’
तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार।’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
No comments:
Post a Comment