Pages

Saturday, May 17, 2014

हास्यरंग - (मराठी विनोद)

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.



कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!




कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.




प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!




एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "




रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…




पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)





मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..




'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?




कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,

मॅडम तुमची हि साडी परत ह्या,

मॅडम : अरे पण का?
...
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...




दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
"आयच्या आयची आय ब्यांक "






संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.






पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.




मराठी भाषा...!!

मराठी भाषा फारच अजब आहे ना...??
.
...गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.......




एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??



बायकॊला "बडबड बंद कर" असं कधीच न सांगता
"ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस" म्हणा.

No comments: