Pages

Saturday, May 17, 2014

पु.लं. चे काही किस्से ...

१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.
हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?
पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"
घरात हशा पिकला होता !

२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की
माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.
माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.
तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी
ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून
द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर
पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना
शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या
खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.
ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या
सुतारांकडून नीट कामच होत नाही."
पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"

५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी
पाठविलेले पत्र.
"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून
महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या
आयुष्यात आला होता."

६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ
वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार
? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या
पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू
’उपदेश-पांडे’ आहेस."

८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची
कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास
नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी
बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल.
थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या
कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही
आहे,मग निर्मीतिस काय कमी?

१०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही
समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.

११) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते
म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

१२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे
छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून
म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

१३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी
बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत
उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत
थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला.
लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले,
'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला
आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

१४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून
कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र
बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी
असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम
ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी
काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते.
तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर
संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

१५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु
लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

१६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा
समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही
तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही
म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

१७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना
दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार
मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर
त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला
माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड
वांग्याचे आहे."

No comments: