Pages

Thursday, January 14, 2010

मराठी मिडियम - तारे जमिन पर..!

१. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहे
उ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.

२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत] माहिती लिहा
उ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणुन ओळखत

३. कारणे द्या - उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उ. एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हांळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पाउन मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

४. खालील बाबतीत काय होईल ते सांगा.
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास...
उ. ग्लास काळा होईल.

५. मराठीत भाषांतर करा.
चिदियां पेडपर चहचहाती हैं |
उ। चिमण्या झाडावर चहा पितात.

---

No comments: