Pages

Thursday, January 14, 2010

हसवा फसवी ..!

नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे .

*******************************

तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम - सीता दाखवू शकतोस का ? नाही ना ? ॥
अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही !!!!

*******************************

आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो !!!

*******************************

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात। तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.


एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .. का?
.. अंगात मस्ती, दुसरं काय?


*******************************

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!


*******************************


हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!


*******************************


अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच। त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?'' त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. '' कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''


'' आपले बाबा !!!! ''

No comments: