Pages

Thursday, January 14, 2010

मस्त जोक्स !!


- - -

मराठी विनोद.....
भिकारी- बाइ साहेब आज मला भीकेंत लाडु घाला.
बाइ साहेब - का रे बाबा?
भिकारी- आज माझा वाढ दीवस आहे..

- - -
विसरभोळे.
प्रोफेसर विसरभोळ्यांचा म्रुत्यु झाला. अंतयात्रेस बरेच लोक व त्यांच्या विद्यापिठांतले सहकारी व विद्यार्थी जमले होते. कसे काय गेले.. एकान विचारल..बहुतेक श्वास घ्यायला विसरले आसतिल..एक विद्यार्थी उदगारला...

- - -
शस्त्र क्रीया
.
ओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता...
घाबरला काय? डोक्टरन विचारल..
हो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला..
घाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाले

- - -
मुल-मुली...
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...
'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला...

- - -
मीत्र..
दोन मीत्र कायम एक मेकावर कुरघोड्या करत आसायचें.
कालांतरांने एका मित्रांची परीस्थिति फ़ार बिघड्ली खायचे वांदे झाले.
पैसे कमी असल्यान तो एका अतिशय थर्ड रेट होटेल मधें जेवयला गेला.
अन समोर पहातो तो काय त्याचा मित्रच वेटर म्हणुन उभा होता.
:मित्रा तु,अन इतक्या थर्ड रेट होटेल मधें काम करतो, अन ते पण वेटरचे?.. अरेरे :
;हो पण मी इतक्या थर्ड रेट होटेल मधें जेवत नाही..; मित्र शांतपणे. म्हणाला...

- - -
भाव..
आचार्य अत्रे सांगत होते..मराठी भाषा फार मजेदार.. शब्द बदलला की भाव बदलतो.उदा..
एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन डोक फुटल..करुण रस.

एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन वीट फुटली..हास्य रस...

- - -
लग्न..
बाबा लग्नाला किती खर्च येतो..?
सांगता येत नाही.. माझा अजुनही चालु आहे..

- - -
दारु..
दारुडा आपल्या दारुड्या मीत्राला बार मधे..
काय दोस्ता फ़ार टेन्शन मधे दिसतोय..दोस्तान विचारल.
[घुट्का घेत} काय सांगु यार..जानेवरी मधे आइ वारली..जाताना माझ्या साठी १ लाख रु. ठेवुन गेली..तो म्हणाला
अरेरे..दोस्त म्हणाला
फ़ेब्रुवारीत बाबा गेले...जाताना माझ्या साठी २लाख रु. ठेवुन गेले..तो म्हणाला
अरेरे.. दोन महीन्यात दोघे गेले.. फ़ार वाइट झाल..दोस्त म्हणाला
गेल्या महीन्यात आत्या गेली.. ति ७०००० हजार ठेवुन गेली..
अरेरे..जवळ्ची माणस गेली.. ३ महीन्यात..फ़ार वाईट झाल..दोस्त म्हणाला
अन ह्या महीन्यांत.. अजीबात कुणीच नाही रे..तो रडत रडत म्हणाला

- - -
ज्योतिशी..
रु ५००० हजारात.कोणतेही ३ प्रश्ण वीचारा.ज्योतिशी जाहिरात करत होता...
एका माणसान विचारल... ३ प्रश्णांना ५००० रुपये म्हणजे जरा त्यास्त होतात नाही?
मान्य आहे.. पुढचा प्रश्ण विचारा..ज्योतिशी म्हणाला....

- - -
पेन्सील..
डोक्टर.. माझ्या मुलांन पेन गिळल आहे. काय करु...फोन वरुन बाबा विचारत होते..
काळजी करु नका..मी येई पर्यंत पेन्सिल वापरा.. डोक्टर म्हणाले..


- - -
मराठी विनोद..
मराठी विनोद..
तो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे.
हा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात..
तो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना..

- - -

बाबुराव अत्यंत तीरसट होते.ते एकदा बस मधें बसले.कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या. आहो पण बस जिमखान्यावर जाते.कंडक्टर म्हणाला..मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........

- - -

मुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा.
बाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात.
काय रे ह्या पैशांचे काय करणार?
काय नाय.. मुलगा उत्तरला..मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.

- - -

मराठी विनोद
पुर्विचे पुरुष होते बाइलवेडे...
अन आताचे पुरुष मोबाइलवेडे..


- - -
बंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली.
दुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले.
काय म्हणालें तुझें वडील? त्यांनी विचारल..
ते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.


- - -

चिंटुन दंगा केला म्हणुन त्याला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता.
चिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले.
त्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला.
बाकावर का बसला? उभा रहा गुरुजी ओरड्ले
पण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....

- - -

मुलांनो आज आम़च्या घ्ररांव्ररुन हत्तींची मीरवणुक गेली.
चिंटु- मग सर तुमच घर पडल असेल नांही.?


- - -


सुरेश - अरे रमेश, तू हुशार आहेस ना, मग माझ्या एका प्रश्‍नाचं उत्तर दे.
रमेश - हो, विचार ना.
सुरेश - राजकारणी म्हणजे कोण? त्याची व्याख्या काय?
रमेश - किती सोपा प्रश्‍न आहे. अरे जो उत्तम पूल बांधून देण्याचं आश्‍वासन देतो, ज्या ठिकाणी नदीचा मुळीच पत्ता नसतो.


- - -


एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला.... का?....

- - -


सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!''

तरीही, घरच्यांच्या
विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न
केलं. पण, लग्नाच्या पहिल्या
रात्रीच डासिणीचा मृत्यू
झाला...

... का?...

...

...

...

...

विचार करा...

...

...

...

अहो, भलतेसलते विचार करू नका!
हत्तीला रात्री 'गुडनाइट'
लावून झोपायची सवय होती!!!!


- - -


मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना 'एकटे' सोडतात.)

मुलगी : तुम्ही काय करता?

मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो...) तुम्हाला काय येतं?

मुलगी (मिष्कीलपणे) : घाम!!!!

मुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?

मुलगी : हो....

मुलगा : मग गाऊन दाखवा ना!

मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!!

मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!

( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध पडतो....)


- - -


अनुपम खेर ला वर्षाअखेर मुलगी झाली........तिचे नाव काय असेल????????

think

think

Ans. वर्षा अ.खेर


- - -


एक माणूस दूध पिता पिता मरतो........कसे काय????????

Think

think








Ans. सिंपल आहे.........म्हॆस खाली बसते......


- - -


एकदा एक माणूस लग्नाला आल्याचा तुकडा (ginger) घेउन जातो. का बरे ???

think


think












Ans. सरळ आहे, कारण लग्नाच्या पत्रिकेवर लिहीलेले असते की लग्नाला 'आल' च पाहिजे..


- - -

एका माणसाची मुलाखत घेतली जाते. त्याला प्रश्न विचारला जातो.

साहेब : Ford म्हणजे काय??
माणूस : Ford म्हणजे गाडी.
साहेब : गुड . Then what is Oxford??
माणूस : Oxford म्हणजे बॆलगाडी.


- - -

वटपोर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केल्यानंतर बायका काय म्हणतात....????

think

think













Ans. वडा-पाव

- - -


सांता‍सिंगचे विनोद


१. शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.
शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.
सांता‍ : आपण त्या स्त्रिला शोधुन हे थांबवायला हवे.


२. सांता‍ : हे सगळे लोक का पळताहेत?
माणुस : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.
सांता‍ : फक्त जिंकणारयाला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.


३. शिक्षक : "मी एका माणसाला ठार मारले आहे", या वाक्याचा भविष्यकाळ काय?
सांता‍ : तुम्ही जेलमध्ये जाल.


४. सांता एकदा आर्ट गँलरीमध्ये जातो.
सांता : ह्या भयानक दिसणारया वस्तुला तुम्ही "आधुनीक कला" म्हणता काय?
विक्रेता : माफ करा महाशय, पण तो आरसा आहे.

- - -


रजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक.

सबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच.
तर शेवटचा सीन सुरू होतो.
सीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग करतोय अर्थातच आपला रजनीकांत. (व्हेल्वेटची टाईट लाल पँट आणि फुलाफुलांचा शर्ट, गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल)
समोरच्या सुपरहीट ब्रिटीश बॉलरने दोन चार उड्या मारल्या. तोंड चार पाचदा तोंड विचकलं, आठ दहा वेळा बॉल मांडीला घासला... दहा बारा वेळा उगाच लूक्स दिले आणि रजनिकांतच्या बॅटीवर जॅम जोशात बॉलिंगसाठी स्टार्ट घेतली.
आता काय होणार...? अशा परिस्थितीत जिंकणार तरी कसं?
थिएटरमधे सगळ्यांचे श्वास वरच्या वर अडकलेले.
पण रजनीकांत एकदम कुल. बॉल येताना बघून तो गॉगल काढतो. वर उडवतो आणि तो गॉगल पुन्हा डोळ्यांवर येऊन बसतो. मग बॅट पुढे सरसावून बॉलला असा टोलावतो. की बॉलची दोन शकलं होतात. एकाची जाते सीक्सर आणि दुसर्‍याची जाते फोररन... आणि अशातर्‍हेने रजनीची टीम मॅच जिंकते.

- - -


पंजाबच्या प्राणिसंग्रहालयातील एक वाघ पिंजऱ्यातूनिसटला आणि थेट माणसांमध्ये घुसला. हजारो माणसांची पळापळ झाली. वाघाने काहीशे माणसांचा पाठलाग केला, पण अखेरीस त्याने दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांचा फडशा पाडला...

...वाघोबा पिंजऱ्यात परतल्यानंतर वाघीणबाईंनी विचारले, 'अहो, इतकी माणसं होती तुमच्यासमोर, इतकी धावपळ करून या दोन चिन्यांनाच का मारलंत तुम्ही?'

वाघोबा म्हणाले, 'काय करणार? कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची!!!'


- - -



गुरुजी मुलांना म्हणतात्:

"मुलांनो शपथ घ्या पाहू, दारु कधी पिणार नाही, सिगरेट पिणार नाही, तंबाख़ू, नॉनव्हेज ख़ाणार नाही, मुलींच्या मागे कधी लागणार नाही, देशासाठी जीवसुध्दा द्यायला मागे रहाणार नाही."

"नक्कीच देऊ गुरुजी", मन्या उत्तरतो, "नाही तरी अश्या जीवाला काय अर्थ आहे?"


- - -



असे होते अत्रे...
एकदा आचार्य अत्रे आपल्या Cycle वरून जात होते. जाता जाता त्याना उतरणीचा रस्ता लागला आणि cycle भरधाव निघाली .समोरून कोणाचीतरी प्रेतयात्रा निघालेली. अत्रेंची cycle ती, ब्रेक प्रकार काही त्यास नव्हता. आरडा ओरडा करून लोकांना सावध करण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. cycle सूसाट्याने यात्रेत शिरली आणि प्रेत धक्का लागून धाराशायी झाले. अगोदरच दुःखात असलेल्या मंडळीना हे सहन झाले नाही. तो पर्यंत अत्र्यांनी cycle वळवून ठेवलेली. लोक मुठी वळवून त्यांना मारण्यास
पूढे सरसावले. आता सरळ निघून जातील ते अत्रे कसले. सर्व जमावाला उद्देशून म्हणाले ," अरे शिंच्यानो, जो खाली पडलाय तो हूं की चूं करत नाहीये. मग तुम्ही कसले चेकाळताय."


- - -


एक दिवस मुंग्या विरुद्धा कोळी अशी फूटबॉलची मॅच असते.मुंग्या ना 6 पाय आणि कोळ्या ना 8 पाय त्यामुळे कोळी दणादण गोल मारतात.मग interval नंतर मुंग्यांकडून गोम खेळायला येतात ......तिला 100 पाय .... त्यामुळे त्या न थांबता गोल च गोल मारतात आणि मुंग्या जिंकतात....

मग पत्रकार परिषद मधे सगळे वा वा thanks गोमा, तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे असे कौतुक करतात ...
पण एक खडूस पत्रकार विचारतो "तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे ठीक आहे पण interval परन्त वेळ का लावला??? भाव खायला काय? ".........
तर गोमा मान हलवत म्हणतात "नाही हो, आधीच येणार होतो पण बूट घालण्यात फार वेळ गेला !!!!"


- - -


तो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले. पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती.
अशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. 'एक्स्क्यूज मी!' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी! पण, आत्ताच माझे आजोबा वारले आहेत.''
ती आनंदानं उसळून म्हणाली, ''थँक यू व्हेरी मच! तुझे वारले नसते तर माझ्या आजोबांना मरावं लागलं असतं!!!!


- - -


काका : कारे गोट्या आई कशी आहे ?
गोट्या : आई बरी आहे
काका : दादा कसा आहे ?
गोट्या : दादा बरा आहे
काका : ताई कशी आहे ?
गोट्या : ताई बरी आहे
काका : आणि तू कसा आहेस ?
गोट्या : काका मी पण बरा आहे
काका : मग बाबा पण बरेच असतील ?
गोट्या : नाही बाबा एकच आहे


- - -

.

No comments: