Pages

Thursday, January 14, 2010

शब्द एक - क्रिया अनेक!

गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तर
श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तर
काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम, तर
श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते!

---

No comments: