Welcome to Marathi Blog. This blog contains all Marathi Stuff including Marathi Articles, Marathi Thoughts, Marathi Jokes, Marathi PJs, Marathi Quiz, Politics Issues, Maharashtra Related Information, Marathi SMS and much much more... Jai Marathi... Jai Maharashtra... Jai Bharat !!!
Saturday, October 9, 2010
वाचा आणि विचार करा...
.
.
.
देव उत्तरला,
.
.
.
मनुष्य पैसा मिलावन्यासाठी आरोग्य गमावतो व् आरोग्य परत मिलावन्यासाठी सर्व पैसा खर्च करतो,
तो भविष्याच्या कालजित वर्तमान सुद्धा गमावतो,
त्यामुले तो वर्त्मानाताही जगत नहीं आणि भविष्यमद्ये पण जगत,
तो असा जगतो की कधीच मारणार नहीं आणि असा मरतो की कधी जगलाच नहीं........
.
Friday, September 3, 2010
माझा आवडता किडा - गोगलगाय
Friday, August 6, 2010
एक PJ, समस्त महिला वर्गाची माफी मागून
बबन : डॉक्टर, तुम्ही बहुतेक बाई चा कान लावलात.
...
डॉक्टर : कशावरून?
बबन : मला ऐकायला व्यवस्थित येतंय, पण समजत काहीच नाहीये.
गुरुजी - गोटया
गोटया : माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी : समज ना. तुझ्या बापच काय जात. बर जाऊ दे.
गुरुजी : बंड्या तू समज तुझ्याकडे १० लाडू आहेत.
बंड्या : माझ्याकडे १० लाडू नाही आहेत.
गुरुजी : समज ना. तुझ्या बापच काय जात. सांग मी तुला अजून ५ लाडू दिले, तर किती झाले?
बंड्या : २० लाडू.
गुरुजी... : अरे मुर्खा २० कसे.
बंड्या : अहो गुरुजी समजा ना, तुमच्या बापच काय जात.
मुलगा - दुकानदार
दुकानदार : (नाकातून बोट काढत) हो आहे की.
मुलगा : मग आधी त्याने हात स्वच्छ धुवा आणि मला दोन किलो बासमती तांदूळ द्या.
भाडेकरू - मालक
घरमालक (रागाने) : मग १५० रुपये भाड्याच्या खोलीत काय "सुरेखा पुणेकर" नाचवू.
परीक्षेच्या RESULT नंतर
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी
शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स
मिळणारच
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू
आणि...
जर नापास झाला
तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे
झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून
ठेवलंस
.
.
.
पण
.
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर
मारू
खरंच.... सगळे बदलतात पण मित्र नाही.....
मंग्या, आयटम बरोबर
मंग्या : सोना, खूप गोड आहे तुझे ओठ, पण जरा ते तोंडातला चुईगम फेकशील का? मध्ये मध्ये येतंय.
आयटम (खोकत) : अरे सोन्या तेच सांगायचा प्रयत्न करत होते, चुईगम नाही आहे ते मला कफ झाला आहे खूप.
Saturday, January 16, 2010
हसा लेको
विक्रत्याने ‘वन सिक्स्टी फाइव्ह’ असं सांगताच पु. ल. म्हणाले, ‘‘अरे बापरे ! मग पाकिटात काय ठेवू ?’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, ‘‘बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !’’ यावर नाक उडवून त्या म्हणाल्या, ‘‘म्हणजे काय? आलेच मुळी !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
पाहुणा एका गावकर्याला विचारतो, ‘‘तुमच्या गावी आजवर एकही मोठा माणूस जन्माला आला नाही म्हणजे नवलच !
गावकरी,‘‘नाही बुवा! आमच्याकडं फक्त अर्भकंच जन्मतात.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
शिक्षक : मुलांनो, जगातले पहिले मानव कोण ?
विद्यार्थी : आदाम आणि ईव्ह !
मास्तर : त्यांचा देश कुठला ?
विद्यार्थी : रशियन !
शिक्षक : याचा पुरावा ?
विद्यार्थी : सर, त्यांना ना घालायला कपडे होते, ना राह्यला घर ! आणि खायला होत तेही एक सफरचंद, आणि तरीही आपण स्वर्गात आहोत, असं त्यांना वाटायचं!
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
एका घरासमोर नित्याप्रमाणे आलेल्या भिकार्याला त्या घराचे मालक रामराव सहलीला गेल्याचे सांगण्यात आले, तेव्हा तो रागाने म्हणाला, ‘‘व्वा ! हा माणूस आमच्या पैशावर झकास मजा मारतोय !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
वेड्यांच्या इस्पितळात एक वेडा डॉक्टरांना म्हणाला, ‘‘डॉक्टर साहेब, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा निराळे वाटता !’’
‘‘कसं काय बुवा’’ डॉक्टर उत्सुकतेनं विचारतात.
‘‘डॉक्टर साहेब,’’ वेडा सांगू लागला, ‘‘तुमचा चेहरा आमच्या चेहर्याशी मिळता-जुळता आहे !’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
मुलगा - बाबा, जर एखादा नेता आपला पक्ष सोडून दुसर्या पक्षात गेला तर तुमच्या राजकीय भाषेत याला काय म्हणावे ?
वडील - विश्वासघात.
मुलगा - आणि समजा, दुसर्या पक्षातला एखादा नेता आपल्या पक्षात आला तर ?
वडील - हृदय परिवर्तन !
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
लवकर निजला, लवकर उठला, तालमीत गेला, घासभर कमी जेवला, प्रामाणिकपणानं वागला आणि एके दिवशी गाडीखाली सापडून मेला. आणि उशिरा निजला, उशिरा उठला, सिनेमाला गेला, तमाशा पाहिला, हॉटेलात गेला, कोंबडी-मटण जेवला अजीर्ण झाले, पोटदुखी झाली, पेन्शन घेतली, प्रॉव्हिडंड फंड घेतला, घर बांधले आणि ९५ व्या वर्षी एके दिवशी उचकीने गेला.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
मंजू : दाढीच्या केसापेक्षा डोक्यावरचे केस लवकर पांढरे का होतात?
महेश : अगं , डोक्यावरच्या केसांचे वय दाढीच्या केसांपेक्षा अठरा वर्षांनी जास्त असते. म्हणून ते लवकर म्हातारे होतात.
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
एका गायनाच्या कार्यक्रमात गायकाला श्रोते सारखा वन्स मोअर देत होते. तेव्हा गायक म्हणाला,‘‘रसिकहो मी तुमचे प्रेम समजू शकतो, पण तुम्ही मला इतक्या वेळा वन्स मोअर का देता ? ’’
तेव्हा त्यातील एक जण म्हणाला, ‘‘जोपर्यंत तुम्ही हे गाणे नीट म्हणत नाही तोपर्यंत आम्ही वन्समोअरच देणार।’’
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
झक्कास विनोद
आफ्रिकेतल्या ओबेडुधोबुडु देशात कम्प्युटर अलीकडेच पोहोचला. कम्प्युटरला 'तो' कम्प्युटर म्हणायचं की 'ती' कम्प्युटर, हे तिथल्या भाषातज्ज्ञांना समजेना. मग त्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली.
तज्ज्ञ पुरुषांच्या गटाचं म्हणणं होतं की कम्प्युटरला 'ती' कम्प्युटरच म्हणायला हवं... कारण,
1. त्यांच्या निमात्याव्यतिरिक्त कोणालाही त्यांचं आंतरिक तर्कशास्त्र कळत नाही.
2. आपल्या 'जाती'च्या अन्य कम्प्युटर्सशी बोलताना जी भाषा वापरतात, ती इतरांना कळत नाही.
3. अगदी लहानात लहान चूकही प्रदीर्घ काळ त्यांच्या 'स्मरणा'त राहते.
4. कम्प्युटरखरेदीचा निर्णय झाला की लक्षात येते, आपण जवळपास मूळ नगाच्या किंमतीइतकीच रक्कम अॅक्सेसरीजवर खर्च करतो आहोत!!!
त्याचवेळी स्त्री तज्ज्ञ म्हणाल्या की कम्प्युटरला 'तो' कम्प्युटरच म्हणायला हवं... कारण,
1. माहिती पुष्कळ असली तरी ते इतरांच्या आज्ञावलीविना स्वत:हून काहीही करू शकत नाहीत.
2. त्यांना अडचणी सोडवण्यासाठी बनवलेलं असतं, पण, बहुतेकदा ते स्वत:च समस्या निर्माण करतात.
3. एक खरेदी करण्याचा निर्णय झाला की लगेच लक्षात येतं, आणखी थोडा वेळ थांबलो असतो, तर जरा बरं मॉडेल मिळालं असतं!!!
4. त्यांच्याशी काहीही करण्याआधी त्यांना 'ऑन' करावं लागतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संता : मेरे पास आज गाडी है... बंगला है... पैसा है... तेरे पास क्या है...?
बंता : मेरे पास भी गाडी है... बंगला है... पैसा है हाईई!
संता : हायला मर गये... फीर माँ किसके पास है?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चंपूराव : काल मुंबईत बर्फ पडला हो.
गंपूराव : कॉय्य सांगता कॉय??
चंपूराव : अरे काय खोटं बोलतो की काय..
गंपूराव : नाही तसं काही नाही, पण कधी, कुठे, केव्हा, कसं??
चंपूराव : काल संध्याकाळी साडेसातला, मरीन ड्राइव्हला
गंपूराव : काल? मरीन ड्रॉईव्हला?
चंपूराव : मग काय तर.. काल संध्याकाळी साडेसातला मरीन ड्राईव्हला एक माणूस सायकलवरून बर्फ घेऊन जात होता. त्याची सायकल कलंडली आणि...आणि बर्फ पडला....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा.
बाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात.
काय रे ह्या पैशांचे काय करणार?
काय नाय.. मुलगा उत्तरला.. मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बाबुराव अत्यंत तीरसट होते. ते एकदा बस मधें बसले.
कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या.
'आहो पण बस जिमखान्यावर जाते.' कंडक्टर म्हणाला..
'मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..' बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे.
हा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात..
तो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकदा एका माणसाला कोस्टिपेसन चा त्रास असतो, तो डॉक्टरांकडे जातो.
पेशंन्ट:"डॉक्टर, मला अलीकडे होत नाही."
डॉक्टर: ठीक आहे, आजपासून पलिकडे बसून बघा. " फ़रक पडतो का?"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?
कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भिमाबाईंना डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी घोडदौडीचा सल्ला दिला.........महिनाभर रपेट केल्यावर त्यांनी वजन करुन पाहीले तर चक्क २० किलो कमी.........घोड्याच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.
डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षक : बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?
चिन्टु : पान नं. १७ ते ४२.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकी : बाबा मला दहा रुपये द्या लवकर, बाहेर एक गरीब माणुस सारख ओरोडतोय .
बाबा : काय ?
विकी : 'आइस क्रीम' घ्या 'आइस क्रीम'....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?....
....
सांगा सांगा का?
अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!''
तरीही, घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न केलं. पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला...
... का?...
...
विचार करा...
अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?
नन्या : गांधीजींचा जन्म झाला.
चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?
नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, ''बाळांनो, वर्गात जर कुणाला सुसु लागली असेल, तर त्याने करंगळी वर करावी.''
नन्या एकदम 'ट्टॉक' करून उद्गारला, ''आयला, गुरुजी, करंगळी वर केली की थांबते सुसु?!!!!''
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमेरिकेहून परतलेला देसी अमेरिकन कसा ओळखावा? या काही खुणा.
१. दुधाच्या पाकिटावर त्यात किती टक्के चरबी आहे, याचा आकडा शोधतो.
२. 'झेड'ला 'झी' म्हणतो.
३. तारीख/ महिना/ वर्ष अशी तारीख न लिहिता महिना/ तारीख/ वर्ष अशी लिहितो.
३. इंडियन स्टँडर्ड टाइम आणि भारतीय रस्त्यांची स्थिती यांची सतत टर उडवतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हे आपणास माहीत आहे का?
...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?
...की डासांना दात सुद्धा असतात...?
...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?
...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?
...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?
...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्या राजांची चित्रे आहेत...?
...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
...की बदकाच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी येत नाही...?
...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही...?
...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?
...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?
...
निबंध लिहा - 'गाय'
विषय - 'गाय'
एका मुलाने लिहिलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय !!!! "
...
Friday, January 15, 2010
आई
पहिला शब्द जो मी उच्चारला,
---
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा
.
Thursday, January 14, 2010
मराठी भाषेची ताकद
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे
---
या जगातील १० सत्य
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०। काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो!
- - -
मस्त जोक्स !!
- - -
मराठी विनोद.....
भिकारी- बाइ साहेब आज मला भीकेंत लाडु घाला.
बाइ साहेब - का रे बाबा?
भिकारी- आज माझा वाढ दीवस आहे..
- - -
विसरभोळे.
प्रोफेसर विसरभोळ्यांचा म्रुत्यु झाला. अंतयात्रेस बरेच लोक व त्यांच्या विद्यापिठांतले सहकारी व विद्यार्थी जमले होते. कसे काय गेले.. एकान विचारल..बहुतेक श्वास घ्यायला विसरले आसतिल..एक विद्यार्थी उदगारला...
- - -
शस्त्र क्रीया
.
ओप्रेशन टेबल वरचा पेशंट खुप घाबरत होता...
घाबरला काय? डोक्टरन विचारल..
हो. ना.. पहिलीच वेळ आहे... तो म्हणाला..
घाबरू नकोस.. माझी पण पहीली वेळ आहे....डोक्टर म्हणाले
- - -
मुल-मुली...
द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...
'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला...
- - -
मीत्र..
दोन मीत्र कायम एक मेकावर कुरघोड्या करत आसायचें.
कालांतरांने एका मित्रांची परीस्थिति फ़ार बिघड्ली खायचे वांदे झाले.
पैसे कमी असल्यान तो एका अतिशय थर्ड रेट होटेल मधें जेवयला गेला.
अन समोर पहातो तो काय त्याचा मित्रच वेटर म्हणुन उभा होता.
:मित्रा तु,अन इतक्या थर्ड रेट होटेल मधें काम करतो, अन ते पण वेटरचे?.. अरेरे :
;हो पण मी इतक्या थर्ड रेट होटेल मधें जेवत नाही..; मित्र शांतपणे. म्हणाला...
- - -
भाव..
आचार्य अत्रे सांगत होते..मराठी भाषा फार मजेदार.. शब्द बदलला की भाव बदलतो.उदा..
एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन डोक फुटल..करुण रस.
एक माणुस रस्त्यावरुन चालला होता. वरच्या मजल्या वरुन डोक्यावर वीट पडली अन वीट फुटली..हास्य रस...
- - -
लग्न..
बाबा लग्नाला किती खर्च येतो..?
सांगता येत नाही.. माझा अजुनही चालु आहे..
- - -
दारु..
दारुडा आपल्या दारुड्या मीत्राला बार मधे..
काय दोस्ता फ़ार टेन्शन मधे दिसतोय..दोस्तान विचारल.
[घुट्का घेत} काय सांगु यार..जानेवरी मधे आइ वारली..जाताना माझ्या साठी १ लाख रु. ठेवुन गेली..तो म्हणाला
अरेरे..दोस्त म्हणाला
फ़ेब्रुवारीत बाबा गेले...जाताना माझ्या साठी २लाख रु. ठेवुन गेले..तो म्हणाला
अरेरे.. दोन महीन्यात दोघे गेले.. फ़ार वाइट झाल..दोस्त म्हणाला
गेल्या महीन्यात आत्या गेली.. ति ७०००० हजार ठेवुन गेली..
अरेरे..जवळ्ची माणस गेली.. ३ महीन्यात..फ़ार वाईट झाल..दोस्त म्हणाला
अन ह्या महीन्यांत.. अजीबात कुणीच नाही रे..तो रडत रडत म्हणाला
- - -
ज्योतिशी..
रु ५००० हजारात.कोणतेही ३ प्रश्ण वीचारा.ज्योतिशी जाहिरात करत होता...
एका माणसान विचारल... ३ प्रश्णांना ५००० रुपये म्हणजे जरा त्यास्त होतात नाही?
मान्य आहे.. पुढचा प्रश्ण विचारा..ज्योतिशी म्हणाला....
- - -
पेन्सील..
डोक्टर.. माझ्या मुलांन पेन गिळल आहे. काय करु...फोन वरुन बाबा विचारत होते..
काळजी करु नका..मी येई पर्यंत पेन्सिल वापरा.. डोक्टर म्हणाले..
- - -
मराठी विनोद..
मराठी विनोद..
तो- अरे माझा कुत्रा हरवला आहे, मी अप सेट आहे.
हा- एवढच ना मग तशी जाहीरात दे ना पेपरात..
तो- अरे पण कुत्र्याला वाचता येत नाही ना..
- - -
बाबुराव अत्यंत तीरसट होते.ते एकदा बस मधें बसले.कंडक्टर आल्यावर म्हणाले एक स्टेशन च तीकीट द्या. आहो पण बस जिमखान्यावर जाते.कंडक्टर म्हणाला..मग मला काय सांगतोस ते त्या ड्रायव्हर ला सांग..बाबुराव तीरसट पणें कंडक्टर ला म्हणालें........
- - -
मुलगा- बाई साहेब मी अंधळा मुलगा आहें मला मदत करा.
बाई साहेबांना दया येते अन त्या त्याला १० रु. देतात. अन कुतुहलाने विचारतात.
काय रे ह्या पैशांचे काय करणार?
काय नाय.. मुलगा उत्तरला..मी अन माझें ४-५ आंधळे मीत्र रात्री सिनेंमा बघायला जाणार आहे.
- - -
मराठी विनोद
पुर्विचे पुरुष होते बाइलवेडे...
अन आताचे पुरुष मोबाइलवेडे..
- - -
बंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली.
दुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले.
काय म्हणालें तुझें वडील? त्यांनी विचारल..
ते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.
- - -
चिंटुन दंगा केला म्हणुन त्याला बाकांवर उभा केला होता. तरीहि त्याचा दंगा चालुच होता.
चिंटु बडबड बंद कर अन गपचुप बस गुरुजी ओरड्ले.
त्यान बडबड बंद केली व बाकांवर बसला.
बाकावर का बसला? उभा रहा गुरुजी ओरड्ले
पण सर तुम्हीच म्हणाला ना की गपचुप बस म्हणुन मी बसलो....
- - -
मुलांनो आज आम़च्या घ्ररांव्ररुन हत्तींची मीरवणुक गेली.
चिंटु- मग सर तुमच घर पडल असेल नांही.?
- - -
सुरेश - अरे रमेश, तू हुशार आहेस ना, मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.
रमेश - हो, विचार ना.
सुरेश - राजकारणी म्हणजे कोण? त्याची व्याख्या काय?
रमेश - किती सोपा प्रश्न आहे. अरे जो उत्तम पूल बांधून देण्याचं आश्वासन देतो, ज्या ठिकाणी नदीचा मुळीच पत्ता नसतो.
- - -
एकदा एका हत्तीचं एका
डासिणीवर (म्हणजे डासाची मादी)
प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं
अफेअर जोरात चाललं. सगळ्या
जंगलात या प्रकरणाची चर्चा
गाजत राहिली. अखेर हत्तीनं
डासिणीच्या वडिलांना भेटून
तिला रीतसर मागणी घातली. पण,
तिच्या घरच्यांनी लग्नाला
प्रचंड विरोध दर्शवला.... का?....
- - -
सांगा सांगा का?
अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक
आहे, मुलाचे दात फार पुढे
आहेत!''
तरीही, घरच्यांच्या
विरोधाला न जुमानता दोघांनी लग्न
केलं. पण, लग्नाच्या पहिल्या
रात्रीच डासिणीचा मृत्यू
झाला...
... का?...
...
...
...
...
विचार करा...
...
...
...
अहो, भलतेसलते विचार करू नका!
हत्तीला रात्री 'गुडनाइट'
लावून झोपायची सवय होती!!!!
- - -
मुलगा मुलीच्या घरी तिला 'पाहायला' गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना 'एकटे' सोडतात.)
मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो...) तुम्हाला काय येतं?
मुलगी (मिष्कीलपणे) : घाम!!!!
मुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?
मुलगी : हो....
मुलगा : मग गाऊन दाखवा ना!
मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!!
मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!
( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध पडतो....)
- - -
अनुपम खेर ला वर्षाअखेर मुलगी झाली........तिचे नाव काय असेल????????
think
think
Ans. वर्षा अ.खेर
- - -
एक माणूस दूध पिता पिता मरतो........कसे काय????????
Think
think
Ans. सिंपल आहे.........म्हॆस खाली बसते......
- - -
एकदा एक माणूस लग्नाला आल्याचा तुकडा (ginger) घेउन जातो. का बरे ???
think
think
Ans. सरळ आहे, कारण लग्नाच्या पत्रिकेवर लिहीलेले असते की लग्नाला 'आल' च पाहिजे..
- - -
एका माणसाची मुलाखत घेतली जाते. त्याला प्रश्न विचारला जातो.
साहेब : Ford म्हणजे काय??
माणूस : Ford म्हणजे गाडी.
साहेब : गुड . Then what is Oxford??
माणूस : Oxford म्हणजे बॆलगाडी.
- - -
वटपोर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पुजा केल्यानंतर बायका काय म्हणतात....????
think
think
Ans. वडा-पाव
- - -
सांतासिंगचे विनोद
१. शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते.
शिक्षक : भारतामध्ये प्रत्येक १० सेंकदाला स्त्री एका मुलाला जन्म देते.
सांता : आपण त्या स्त्रिला शोधुन हे थांबवायला हवे.
२. सांता : हे सगळे लोक का पळताहेत?
माणुस : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.
सांता : फक्त जिंकणारयाला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.
३. शिक्षक : "मी एका माणसाला ठार मारले आहे", या वाक्याचा भविष्यकाळ काय?
सांता : तुम्ही जेलमध्ये जाल.
४. सांता एकदा आर्ट गँलरीमध्ये जातो.
सांता : ह्या भयानक दिसणारया वस्तुला तुम्ही "आधुनीक कला" म्हणता काय?
विक्रेता : माफ करा महाशय, पण तो आरसा आहे.
- - -
रजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक.
सबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच.
तर शेवटचा सीन सुरू होतो.
सीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग करतोय अर्थातच आपला रजनीकांत. (व्हेल्वेटची टाईट लाल पँट आणि फुलाफुलांचा शर्ट, गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल)
समोरच्या सुपरहीट ब्रिटीश बॉलरने दोन चार उड्या मारल्या. तोंड चार पाचदा तोंड विचकलं, आठ दहा वेळा बॉल मांडीला घासला... दहा बारा वेळा उगाच लूक्स दिले आणि रजनिकांतच्या बॅटीवर जॅम जोशात बॉलिंगसाठी स्टार्ट घेतली.
आता काय होणार...? अशा परिस्थितीत जिंकणार तरी कसं?
थिएटरमधे सगळ्यांचे श्वास वरच्या वर अडकलेले.
पण रजनीकांत एकदम कुल. बॉल येताना बघून तो गॉगल काढतो. वर उडवतो आणि तो गॉगल पुन्हा डोळ्यांवर येऊन बसतो. मग बॅट पुढे सरसावून बॉलला असा टोलावतो. की बॉलची दोन शकलं होतात. एकाची जाते सीक्सर आणि दुसर्याची जाते फोररन... आणि अशातर्हेने रजनीची टीम मॅच जिंकते.
- - -
पंजाबच्या प्राणिसंग्रहालयातील एक वाघ पिंजऱ्यातूनिसटला आणि थेट माणसांमध्ये घुसला. हजारो माणसांची पळापळ झाली. वाघाने काहीशे माणसांचा पाठलाग केला, पण अखेरीस त्याने दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांचा फडशा पाडला...
...वाघोबा पिंजऱ्यात परतल्यानंतर वाघीणबाईंनी विचारले, 'अहो, इतकी माणसं होती तुमच्यासमोर, इतकी धावपळ करून या दोन चिन्यांनाच का मारलंत तुम्ही?'
वाघोबा म्हणाले, 'काय करणार? कितीतरी दिवस इच्छा अपुरी होती माझी चमचमीत चायनीज खाण्याची!!!'
- - -
गुरुजी मुलांना म्हणतात्:
"मुलांनो शपथ घ्या पाहू, दारु कधी पिणार नाही, सिगरेट पिणार नाही, तंबाख़ू, नॉनव्हेज ख़ाणार नाही, मुलींच्या मागे कधी लागणार नाही, देशासाठी जीवसुध्दा द्यायला मागे रहाणार नाही."
"नक्कीच देऊ गुरुजी", मन्या उत्तरतो, "नाही तरी अश्या जीवाला काय अर्थ आहे?"
- - -
असे होते अत्रे...
एकदा आचार्य अत्रे आपल्या Cycle वरून जात होते. जाता जाता त्याना उतरणीचा रस्ता लागला आणि cycle भरधाव निघाली .समोरून कोणाचीतरी प्रेतयात्रा निघालेली. अत्रेंची cycle ती, ब्रेक प्रकार काही त्यास नव्हता. आरडा ओरडा करून लोकांना सावध करण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. cycle सूसाट्याने यात्रेत शिरली आणि प्रेत धक्का लागून धाराशायी झाले. अगोदरच दुःखात असलेल्या मंडळीना हे सहन झाले नाही. तो पर्यंत अत्र्यांनी cycle वळवून ठेवलेली. लोक मुठी वळवून त्यांना मारण्यास
पूढे सरसावले. आता सरळ निघून जातील ते अत्रे कसले. सर्व जमावाला उद्देशून म्हणाले ," अरे शिंच्यानो, जो खाली पडलाय तो हूं की चूं करत नाहीये. मग तुम्ही कसले चेकाळताय."
- - -
एक दिवस मुंग्या विरुद्धा कोळी अशी फूटबॉलची मॅच असते.मुंग्या ना 6 पाय आणि कोळ्या ना 8 पाय त्यामुळे कोळी दणादण गोल मारतात.मग interval नंतर मुंग्यांकडून गोम खेळायला येतात ......तिला 100 पाय .... त्यामुळे त्या न थांबता गोल च गोल मारतात आणि मुंग्या जिंकतात....
मग पत्रकार परिषद मधे सगळे वा वा thanks गोमा, तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे असे कौतुक करतात ...
पण एक खडूस पत्रकार विचारतो "तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे ठीक आहे पण interval परन्त वेळ का लावला??? भाव खायला काय? ".........
तर गोमा मान हलवत म्हणतात "नाही हो, आधीच येणार होतो पण बूट घालण्यात फार वेळ गेला !!!!"
- - -
तो आणि ती एका कॉफीशॉपमध्ये ब्लाइंड डेटवर भेटले. पण त्याला तिच्याबरोबर एक मिनिटही घालवणंही जड जात होतं. केमिस्ट्री जमत नव्हती.
अशी वेळ आलीच तर सुटका व्हावी, म्हणून त्यानं एका मित्राला मोबाइलवर फोन करायला सांगून ठेवलं होतं. अचानक त्याचा मोबाइल वाजला. 'एक्स्क्यूज मी!' म्हणून तो लांब गेला आणि अगदी पडेल चेहऱ्यानं तिच्यापाशी येऊन म्हणाला, ''व्हेरी सॉरी! पण, आत्ताच माझे आजोबा वारले आहेत.''
ती आनंदानं उसळून म्हणाली, ''थँक यू व्हेरी मच! तुझे वारले नसते तर माझ्या आजोबांना मरावं लागलं असतं!!!!
- - -
काका : कारे गोट्या आई कशी आहे ?
गोट्या : आई बरी आहे
काका : दादा कसा आहे ?
गोट्या : दादा बरा आहे
काका : ताई कशी आहे ?
गोट्या : ताई बरी आहे
काका : आणि तू कसा आहेस ?
गोट्या : काका मी पण बरा आहे
काका : मग बाबा पण बरेच असतील ?
गोट्या : नाही बाबा एकच आहे
- - -
.
मुलाचा निबंध !!
बदक मला आवडते!!॥बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!।बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येत नाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)...मला बदक खुप आवडते!!
---
मराठी लोकांची हिंदी
=====================================
पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम?पहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!
घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!
सरबत मे लिंबु पिळा क्या!!
इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!
कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!
अरे बाबा गाडी सावली मे लगा!!
ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!
केस एकदम बारीक कापो भैया!!
खाओ पोटभर खाओ लाजो मत!!
=====================================
राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'
'ई सकाळ' ने घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.
'ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.
विश्वास नांगरे पाटील दुसऱया स्थानावर
राज ठाकरे यांनी एकूण ऑनलाईन आणि एसएमएसवर ५४ टक्के लोकांची पसंती मिळवित युथ आयकॉन असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्रात मराठी तरुणांसाठी व मराठी भाषा टिकावी यासाठी आंदोलन करणाऱ्या राज यांनी जगभरातील मराठी माणसाला आकृष्ट केले असल्याचे यातून पुढे आले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी नांगरे पाटील यांचेही नाव या यादीत सचिन तेंडूलकरच्या आधी, दुसऱ्या क्रमांकावर आहे.
संपूर्णपणे वाचकांचा प्रतिसाद
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यामध्ये कोणतीही यादी निश्चित नसताना, सुमारे तीन हजार वाचकांनी स्वतः यादी बनविली. युथ आयकॉन म्हणून आपण कोणाचा आदर्श समोर ठेवतो, हे कळविले. त्यामधून समान नावे पुढे आली आणि त्या नावांचा क्रमही एसएमएसद्वारे ठरविण्यात आला. त्यामुळेच यादीमध्ये एकाचवेळी 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव आहे, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांचेही नाव आले आहे. आदर्श वाटणाऱ्या, भावलेल्या व्यक्तींची नावे वाचकांनी 'ई सकाळ'वर मांडली होती. राजकारण, क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन, संगीत, विज्ञान आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नावे यामध्ये होती. 'ई सकाळ'वर 'युथ आयकॉन'साठी आलेल्या नावांमधून दहा नावांची निवड करण्यात आली. त्यावर 'एसएमएस'द्वारे मते मागविण्यात आली.
युथ आयकॉन्स् आणि टक्केवारी
राज ठाकरे - (५६.१५ टक्के)
ठाकरे घराण्याचा वारसा असलेले राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरेंनी आजपर्यंत मराठी भाषेसाठी अनेक आंदोलने करीत महाराष्ट्रातील तरूणाईच्या मनात स्थान मिळविले आहे.
विश्वास नांगरे पाटील - (१०.६२ टक्के)
एका सामान्य कुटुंबातील तरूणाची पोलिस अधिकारी पदापर्यंतची वाटचाल नांगरे पाटील यांच्या रुपाने मराठी युवा मनासमोर आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण, मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी केलेली कामगिरी तरूणाईच्या मनावर विशेष ठसली आहे.
सचिन तेंडुलकर - (९.५७ टक्के)
वयाच्या सोळाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवकाशावर चमकू लागलेला हा सुपरस्टार. सचिनने आज अनेक विक्रम प्रस्थापित करीत आपणच क्रिकेटचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. सचिनच्या याच कामगिरीमुळे तो आजही करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे.
अमीर खान - (५.७८ टक्के)
आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा अभिनेता अमिर खान आज वयाच्या ४४ व्या वर्षीही तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. 'यादों की बारात' ते 'थ्री इडियट्स' पर्यंतचा अमिरचा प्रवास उल्लेखनीय आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - (४.६२ टक्के )
भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम यांनी व्हिजन '२०२०' मधून भारताला नवी दिशा दाखविली आहे. 'विंग्ज ऑफ फायर' हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे.
राहुल गांधी - (३.८९ टक्के )
कॉंग्रेसचे युवा खासदार राहुल गांधी वयाच्या चाळीशीत तरुणांचे रोल मॉडेल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. भारताचे भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
डॉ. प्रकाश आमटे - (३.२६ टक्के)
आशियातील नोबेल मानल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 'हेमलकसा' या प्रकल्पात कुष्टरोग्यांसाठी ते उल्लेखनीय काम करीत आहेत.
नारायण मूर्ति - (२.२० टक्के)
पद्मविभूषण पुरस्कार विजेते नारायण मूर्ति यांचा इन्फोसिस टेक्नॉलॉजिस या कंपनीच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. भारतातील आयटी क्षेत्रात या कंपनीच्या स्थापनेमुळ एक प्रकारची क्रांतीच आली.
उद्धव ठाकरे - (२.१० टक्के)
शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात यांची मोलाची भूमिका आहे.
नितीन गडकरी - (१.७८ टक्के)
भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष हा नितीन गडकरी यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे.
हसवा फसवी ..!
*******************************
तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी आणू शकतोस का ? छाती फाडून राम - सीता दाखवू शकतोस का ? नाही ना ? ॥
अरे वेड्या, फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही !!!!
*******************************
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो !!!
*******************************
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात। तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... .. का?
.. अंगात मस्ती, दुसरं काय?
*******************************
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का? जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
*******************************
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
*******************************
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच। त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?'' त्यानं उत्तर दिलं, '' पाहिलं. '' कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''
'' आपले बाबा !!!! ''
*******************************
.
शब्द एक - क्रिया अनेक!
मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तर
श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!
काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तर
काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!
गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम, तर
श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!
शब्दाने शब्द वाढला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते
शब्दाने शब्द वाढला की लेखकाची रॉयल्टी वाढते!
---
कारणे दाखवा ... बायका लग्न का करतात..?
* गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन
* जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन
* पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी
* आई-बापावर दया म्हणुन
* मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?
* नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन...
* नव-याच्या जिवावर मुलांची हौस भागवता येते - फ्रींज बेनिफिट
* मुक्त होण्यासाठी - लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी आणि कुणापासुन मिळणार?
* आपल्या पाककृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्यावर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा 'बकरा' मिळतो
* लग्नानंतर मुली उजळतात म्हणे ... फेअरलेस क्रीम फासुन थकल्यावर एक शेवटचा 'जालीम' उपाय म्हणुन !!
---
लाजायचं काय त्यात..?
तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...
भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...
कुणीतरी खास भेटावं ...!
हो ना?
... अरे हो म्हण ना..! लाजायचं काय त्यात..?
प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत...!
--
मराठी मिडियम - तारे जमिन पर..!
१. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहे
२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत] माहिती लिहा
उ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणुन ओळखत
३. कारणे द्या - उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उ. एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हांळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पाउन मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
४. खालील बाबतीत काय होईल ते सांगा.
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास...
उ. ग्लास काळा होईल.
५. मराठीत भाषांतर करा.
चिदियां पेडपर चहचहाती हैं |
उ। चिमण्या झाडावर चहा पितात.
---
मराठी पी.जे.
>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
>भगवानदास गॉडवाणी
३. सिंधी चित्रकार?
>सदारंगानी!
४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
> थंडानी
५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
> क्रिपलानी
६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
> मरजानी
७. कम्युनिस्ट सिंधी?
>कार्ल लालवाणी
८. सिंधी शेफ?
>पापडमल कुकरेजा
९. सिंधी इलेक्ट्रिशियन
>व्होल्टराम बिजलानी
१०. फॅशनेबल सिंधी?
>जोगिओ अरमानी
११. सिंधी दूधवाला?
>गोपाल दुधेजा
१२. शूर शिपाई?
>हिरू सिपाहीमालानी
१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
>खटमल मारवानी
१४. सिंधी आगीचा बंब?
>बंबानी
१५. सिंधी पोस्टमन?
>मेलवानी
१६. विसरभोळा सिंधी?
>बुलो भूलचंदानी
१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
>चायपानी !!
---
मराठी सुविचार,
- सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- "तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार - श्री. वामनराव पै.
- आधी विचार करा, मग कृती करा.
- स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.......
- कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते
- आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!
- शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!
- निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......
- ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
- जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो
- मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
- आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
- एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
- तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
- सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
- सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
मी मराठी ...!
-0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0-
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
हा एक मराठी ब्लॉग आहे, जिथे मी माझे विचार, लेख, मनोरंजक गोष्टी, पीजे, चुटकुले आणि बरेच काही लिहिणारआहे, आशा करतो तुम्हाला आवडेल. मी एका संयुक्त महाराष्ट्राचे आणि एका प्रबल मराठी संस्कृतिचे स्वप्नपाहणार आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी बहुदा माझे पूर्णायुश्य लागेल, कदाचित ते ही पुरेसे पडणार नाही. पणप्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, म्हणून आज संकल्प सोडत आहे.
- स्नेहल मसने
( सॉफ्टवेर इंजिनियर )
-0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0- -0-
.